भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

आॅक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी (4 सप्टेंबर) बीसीसीआयने जाहिर केले आहे.

या दौऱ्यातील भारत विरुद्ध विंडिज संघात 6 नोव्हेंबरला होणारा दुसरा टी20 सामना लखनऊ येथील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हा सामना या मैदानावरील पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असल्याने खास असणार आहे. या सामन्याचे आयोजन उत्तरप्रदेश क्रिकेट असोसिएशनकडे दिले होते. त्यामुळे कानपूर आणि लखनऊ असे दोन पर्याय होते. पण आता लखनऊमध्ये हा सामना होणार असल्याचे अधिकृतरित्या निश्चित झाले आहे.

या मैदानावर याआधी रणजी आणि दुलीप ट्रॉफी या स्पर्धांचे देशांतर्गत स्थरावरील सामने झाले आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचाही एकही सामना या मैदानावर झाला नव्हता.

मागील वर्षी न्यूझीलंड विरुद्धचा भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना या मैदानावर होणार होता. परंतू त्यावेळी तो सामना सुविधांच्या आभावी कानपूरला हलवला होता.

त्याचबरोबर यावर्षी आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघांनी यामैदानावर खेळण्यास पसंती दर्शवली होती. परंतू या मैदानावर यावर्षीच्या आयपीएलमधील एकही सामना पार पडला नाही.

पण आता 50000 प्रेक्षक क्षमता असणारे हे मैदान पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यास सज्ज झाले आहे.

भारत आणि विंडिजमध्ये या दौऱ्यात 2 कसोटी, 5 वनडे आणि 3 टी20 सामने होणार आहेत. हा दौरा 4 आॅक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत आहे.

यातील पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे राजकोट आणि हैद्राबादला होणार आहेत. तसेच त्यानंतर होणाऱ्या वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदोर, पुणे, मुंबई आणि तिरुअनंतपुरम येथे होतील.

त्याचबरोबर या दौऱ्याच्या शेवटी टी20 मालिका होणार आहे. यातील पहिला आणि तिसरा टी20 सामना अनुक्रमे कोलकता आणि चेन्नईला होणार आहे. तर दुसरा सामना लखनऊला पार पडेल.

2016 च्या टी 20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

Video: यष्टीरक्षक इशान किशनची एमएस धोनी स्टाईल किपिंग

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती