एमएस धोनीला रनआऊट केल्याबद्दल मार्टिन गप्टिल म्हणतो…

2019 क्रिकेट विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. या सामन्यात भारताला 18 धावांनी पराभवाता सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 49 व्या षटकात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला मार्टिन गप्टिलने स्टम्पवर थेट चेंडू फेकत धाव बाद केले होते.

धोनीच्या धावबाद होण्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकला. धोनी बाद झाल्यानंतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला होता.

धोनीला केलेल्या धावबाद बद्दल गप्टिलने आयसीसीला एका मुलाखतीत सांगितले आहे की ‘मी विचार केला नव्हता की चेंडू माझ्याकडे येईल. मी चेंडू पकडल्यानंतर शक्य तितक्या लवकर तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. मला वाटले स्टम्प एकदम सरळ आहे.’

‘मी सुदैवी आहे की मी उभा असलेल्या ठिकाणाहून चेंडू थेट स्टंम्पला लागला. आमच्यासाठी तो(धोनी) त्यावेळी क्रिजच्या बाहेर होता, हे चांगले झाले.’

या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारताची आवस्था बिकट झाली होती. भारताने पहिल्या 6 विकेट्स 92 धावांवरच गमावल्या होत्या. परंतू धोनी आणि रविंद्र जडेजाने 116 धावांची 7 व्या विकेटसाठी भागिदारी रचत भारताला सावरले होते.

परंतू हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र भारताला पराभव स्विकारावा लागला. जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली. तर धोनीने 72 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनीला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचे रवी शास्त्री सांगितले कारण…

विराट कोहली, युवराज सिंगने एबी डिविलियर्सला असा दिला पाठिंबा

ऍडम गिलख्रिस्टने एमएस धोनीला दिला हा खास संदेश