पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: द मेयर बाबुराव सणस मेमोरियल इंडिपेंडन्स मिलियन शर्यतीत लकी लुसियानो विजेता

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत सर्वात महत्वाच्या द मेयर बाबुराव सणस मेमोरियल इंडिपेंडन्स मिलियन या शर्यतीत लकी लुसियानो या घोड्याने 2000मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी द मेयर बाबुराव सणस मेमोरियल इंडिपेंडन्स मिलियन या महत्वाच्या लढतीत डायमंड बँड रेसिंग सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी शिवेन सुरेंद्रनाथ, के.एच.वच्छ आणि बेरझिस जे.इंजिनियर्स यांच्या मालकीच्या लकी लुसियानो या घोड्याने 2मिनिट 5सेकंद व 713मिनिसेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. याचा ए. इम्रान खान हा जॉकी होता, तर अधिराजसिंग जोधा हा ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:
द मेयर बाबुराव सणस मेमोरियल इंडिपेंडन्स मिलियन
विजेता: लकी लुसियानो, उपविजेता: बेनिवोलेन्स