मँचेस्टर डर्बीच्या थरारात युनाइटेड विजयी

आज सर्व फुटबाॅल चाहत्यांना इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपच्या दुसऱ्या सामन्यात मॅन्चेस्टर डर्बी चा थरार अनुभवायला मिळाला. सामन्यात मॅन्चेस्टर युनायटेडने मॅन्चेस्टर सिटीचा २-० असा पराभव केला.

सामन्याच्या सुरवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या हाफचे अवघे ८ मिनिट बाकी असताना पोगबाचा पास लुकाकुने घेतला आणि नेट पासून बऱ्याच पुढे आलेल्या गोलकिपरला चकवत आपला युनायटेडतर्फे पहिला गोल केला. अवघ्या २ मिनिटच्या अंतराने मखितारयनच्या असिस्टने राशफोर्डने गोल केला आणि युनिटेडला २-० बढत मिळवून दिली.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच युनायटेडने ४ आणि सिटी ने ७ बदल केले. पण संपूर्ण हाफ दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. या विजयासह युनायटेड अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे.

दोन्ही संघांचा पुढचा सामना रियाल माद्रीद बरोबर आहे. मॅन्चेस्टर युनायटेडचा सामना २४ जुलैला आणि मॅन्चेस्टर सिटी चा २७ जुलैला असणार आहे.

नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स)