दुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने उपहारापर्यंत ५ बाद ४४२ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आज सकाळच्या सत्रात बाद झाले आहेत.

भारताला आज दिवसातील पहिला झटका चेतेश्वर पुजाराच्या रूपाने ९२ व्या षटकात बसला. पुजारा कालच्या धावसंख्येचा ५धावांची भर घालून १३३ धावांवर बाद झाला. अजिक्य रहाणेलाही आज काही खास करिष्मा दाखवता आला नाही. त्याने कालच्या धावसंख्येत २९ धावांची भर घालून १३२ धावांवर तो बाद झाला.

सध्या आर अश्विन ४७ धावांवर तर वृद्धिमान सहा १६ धावांवर खेळत आहे.