Breaking: भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा झाली आहे. लुंगी न्गिडी या खेळाडूला मर्यादित षटकांच्या या मालिकेत संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत तब्बल १०० प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खाया झोनदो या खेळाडूही संघात स्थान देण्यात आले आहे.

या मालिकेतील पहिला सामना १ फेब्रुवारी रोजी डर्बन येथे होणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या वनडे मालिकेत लुंगी न्गिडी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. नाहीतर त्याने कसोटीपूर्वीच वनडेत पदार्पण केले असते. खाया झोनदो २०१५ रोजी दक्षिण आफ्रिका संघासोबत भारत दौऱ्यावर आला होता परंतु त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नव्हती.

बांगलादेशविरुद्ध मालिकेत दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या मॉर्ने मॉर्केल आणि ख्रिस मॉरिसला दक्षिण आफ्रिका संघात स्थान देण्यात आले आहे.

२०१९मध्ये इंग्लंड देशात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला समोर ठेवून हा संघ निवडण्यात आले असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

या मालिकेत कर्णधारपद फाफ डुप्लेसीकडे कायम ठेवण्यात आले असून डिकॉककडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत या मालिकेत ६ वनडेत सामन खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका वनडे संघ: फाफ डू प्लेसी (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, एबी डिव्हिलियर्स, जे पी डुमिनी, इम्रान ताहीर, एदेन मारक्रम, डेविड मिलर, मॉर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगी न्गिडी, अँडील फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, खाया झोनदो