५ ऑगस्ट पासून एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीगला सुरुवात

पुणे। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने ५ ऑगस्ट2019 पासून ‘एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उदघाटन सुहेल सिंग घई (माजी राष्ट्रीय खेळाडू )यांच्या हस्ते होणार आहे.

हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थांचे १४ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत . ही स्पर्धा आझम कॅम्पस बॅडमिंटन कोर्ट (पुणे कॅम्प ) येथे होईल . ८ ऑगस्टला समारोप होईल .स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे .