आजपासून मध्यप्रदेश कबड्डी लीगचा थरार, या चॅनेलवर थेट प्रेक्षपण

-सोहन बोरकर

प्रो कबड्डीच्या उदयानंतर कबड्डी या खेळाला एक नवसंजीवनीच मिळाली आहे. याच धर्तीवर कबड्डीच्या अनेक छोट्या मोठ्या लीग उदयास येत आहेत. देशातील प्रो कबड्डी नंतर महाराष्ट्राची महा कबड्डी लीग, तेलंगणा राज्याची तेलंगणा कब्बडी लीग, गोवा राज्याची गोवा कबड्डी लीग आणि आता आजपासून मध्यप्रदेश राज्याची मध्यप्रदेश कबड्डी लीग इंदोर मध्ये सुरू होत आहे.

प्रसिद्ध स्पोर्ट्स कंपनी प्लम स्पोर्ट्स हे या कबड्डी लीगची आयोजक आहेत. यामध्ये मध्यप्रदेश राज्यामधील ८ प्रमुख शहरांचे ८ संघ सहभागी होणार आहेत.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार या लीगमध्ये सहभागी होणारे खेळाडू हे मध्यप्रदेश राज्यासोबतच इतर राज्यामधील ही काही नावाजलेले खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रो कबड्डीमधील सहभागी झालेले २ खेळाडू अनिल पाटील व नितीन मोरे हे प्रमुख खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत.

कबड्डी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या लीगचे थेट प्रक्षेपण निओ स्पोर्ट्स या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही लीग महाराष्ट्र मध्ये देखील घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहून या लीगचा आनंद घेऊ शकता.

आजचे सामने:
१) इंदोरी योद्धास वि ग्वालिअर महाराजास (संध्या.६.०५)
२) भोपाली नवाब्जस वि. जबलपूर जानबाज (संध्या. ७.०५)
३) सागर सुलतान वि. उज्जैनि धाकड (रात्री ८.०५)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी

-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?