माद्रिद डर्बी रंगणार आज..!!

स्पॅनिश साखळी ला लिगा मध्ये प्रथम क्रमांकावर असणारा रियाल माद्रिद वि. तिसऱ्या स्थानावर असलेल्या अटलेटिको माद्रिद यांच्यात आज सामना रियल माद्रिदच्या घराच्या मैदानात रंगणार आहे. दोन्ही संघ माद्रिद शहरातील आहेत. एकाच प्रकारचा आक्रमक खेळ करणारे हे कट्टर प्रतिस्पधी जेव्हा आमने सामने असतात तेव्हा प्रेक्षकांची पर्वणीच असते.
रियाल माद्रिद ७१ गुणांसोबत आवळा स्तनावर असून बार्सिलोना ६९ गुणांसोबत दुसऱ्या स्तनावर आहे. मागच्या वर्षी युएफा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभव आणि नोव्हेंबर मध्ये ला लीगा मध्येही अटलेटिको संघाला पराभव पचवावा लागला होता. अटलेटिको संघाची मदार भन्नाट फॉर्म मध्ये असलेल्या अंटोनियो ग्रीझमनवर तर रियालची मदार ख्रिस्तियानो रोनाल्डोवर. दोन्ही संघाची नजीकची कामगिरी खूप चांगली असल्याने सामना रंगतदार होईल यात शंका नाही.
आजचा सामना जिंकुन बढत आणखी मजबूत करण्यासाठी रियाल मैदानात उतरेल तर मागील दोन पराभवाची परतफेड करणार का ही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.