- Advertisement -

अंडर १७ फुटबॉल विश्वचषक आयोजक मुंबई शहराच्या लोगोचे अनावरण..

0 82

भारतात होणाऱ्या अंडर १७ फुटबॉलच्या विश्वचषकाच्या सामन्यांचे आयोजन करणाऱ्या शहरांची नावे अगोदरच घोषीत झाली होती. सहा आयोजक शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुंबई येथे आठ सामने होणार आहेत.

फुटबॉलमय झालेल्या महाराष्ट्राने मुंबई शहराचा लोगो तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजक मुंबई शहराच्या लोगोचे अनावरण केले. या अनावरण सोहळ्याच्या वेळी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील हे देखील उपस्थित होते.

या अनावरण सोहळ्याच्या वेळी बोलताना फिफाच्या आयोजन समिती अध्यक्ष झेवियर सेप्पी म्हणाले,” हे खूप चांगले झाले की नवी मुंबईने विश्वचषकासाठी आपला लोगो तयार केला आहे. याचा उपयोग ते विश्वचषकाच्या प्रसिद्धीसाठी शहरात सर्वत्र करू शकतील.”

काही दिवसांपूर्वी झेवियर सेप्पी यांनी एका पत्रकात भारताने फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यावर जास्तीचा खर्च करू नये, त्याऐवजी भारतात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी तो पैसा मार्गी लावावा असा सल्ला दिला होता.

Comments
Loading...
%d bloggers like this: