दुसऱ्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा संघ अंतिम फेरीत

पुणे । श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड महिला हाॅकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे.

महाराष्ट्राच्या संघाने पंजाब संघाचा रोमहर्षक सामन्यात ६-५ असा पराभव केला. यात महाराष्ट्राच्या लालरुवात फिलीने ३, ऐश्वर्या चव्हाणने २ तर कविता विद्यार्थीने १ गोल केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये २, दुसऱ्यात १ आणि तिसऱ्यात ३ असे एकूण ६ गोल महाराष्ट्र संघाकडून करण्यात आले.

महाराष्टाच्या महिलांचा संघ गेल्यावर्षी या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

दुसऱ्या उपांत्यफेरीत हरियाणा संघाने उत्तर संघाचा ९-१ असा पराभव केला.

आज संध्याकाळी ७वाजता महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा अंतिम सामना बालेवाडी पुणे येथे होणार आहे.