राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत, रिशांक देवाडिगाने शेवटच्या सेकंदाला सामना फिरवला

हैद्राबाद । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने चांगला खेळ करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राने तगड्या कर्नाटक संघाचा ३५-३४ असा पराभव केला. कर्णधार रिशांक देवाडिगाने आपल्याला या मोसमात महाराष्ट्राचे नेतृत्व का दिले आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

कर्नाटक संघात प्रो कबड्डी मधील स्टार खेळाडूंचा भरणा होता. त्यात सुकेश हेगडे, के प्रपंजन, प्रशांत राय, जीवा कुमार आणि शब्बीर बापू यांचा समावेश आहे तर महाराष्ट्राच्या संघात रिशांक देवाडिगा सचिन शिंगाडे,गिरीश इर्नाक, निलेश साळुंखे आणि नितीन मदने सारखे स्टार खेळाडू होते.

महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाने नाणेफेक जिंकून कोर्ट घेतले. सुकेश हेगडे कर्नाटककडून तर निलेश साळुंखेने महाराष्ट्राकडून डू ऑर डाय रेड असताना बोनस गुण घेतले.

सामन्याच्या ८व्या मिनिटाला महाराष्ट्राला बचावातून गुण मिळाला. यानंतर सामन्यातील १०व्या मिनिटाला महाराष्ट्राने कर्नाटक संघाला सर्वबाद केले. यात कर्णधार सुकेश हेगडेचा मोठा वाटा होता. यानंतर मात्र प्रत्येक रेडमध्ये गुण घेणाऱ्या महाराष्ट्राचा कर्णधार सुकेश हेगडेचा दर्शनने सुपर टॅकल केला. पूर्वार्धात समाप्तीला काही वेळ बाकी असताना महाराष्ट्राने पुन्हा कर्नाटक संघाला बाद केले. यावेळी रेड करत होता निलेश साळुंके.

पूर्वार्धात महाराष्ट्राने कर्नाटकवर २२-११ अशी आघाडी घेतली. उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरुद्ध ५१ गुण घेणार हाच का तो संघ एवढा खराब खेळ कर्नाटक संघाकडून होत होता. उत्तरार्धात महाराष्ट्राने प्रथमच निलेश शिंगाडे या खेळाडूला ४ मिनिटांचा खेळ झाला तेव्हा मैदानात उतरवले. उत्तार्धात चांगले कमबॅक करत महाराष्ट्राला सर्वबाद केले.

यानंतर कर्नाटकच्या बचाव फळीने चांगला खेळ करत महाराष्ट्राला जखडून ठेवले. त्यात अनेक तांत्रिक गुण हे कर्नाटकच्या खात्यात गेले. कर्नाटकच्या जीवाकुमारला पंचांशी हुज्जत घातल्या प्रकरणी ग्रीन कार्ड देण्यात आले.

उत्तरार्धात १७व्या मिनिटाला रिशांक देवाडिगाने डू ऑर डाय रेड असताना चांगली कामगिरी करत जीवा कुमारला बेंचवर पाठवले. कर्नाटक संघाचा कर्णधार असलेल्या सुकेश हेगडे रेड आणि बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर जबदस्त कामगिरी करत गुणांचा मोठा फरक भरून काढला. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राकडे ३१-२७ अशी आघाडी होती.

सामना संपायला एक मिनिट बाकी असताना के प्रपंजनचे सुपर टॅकल करत स्कोर बरोबरीत आणला. सामन्याचे ३० सेकंद बाकी असतानाही दोन्ही संघांचा स्कोर सारखाच होता. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगाने २ सेकंद बाकी असताना जबरदस्त खेळ करत २ गुण घेत महाराष्ट्राचा विजय साकार केला.