पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय

हैद्राबाद । महाराष्ट्राच्या महिलांच्या संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही जबरदस्त कामगिरी करत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहे. महाराष्ट्राने पॉंडिचेरी संघाचा ४८-२३ असा पराभव करत क गटात अव्वल स्थान मिळवले.

महाराष्ट्राचा सामना आता फ गटातील दुसऱ्या स्थानी राहिलेल्या संघाशी होईल. त्याचे चित्र आज पुढील २ तासात स्पष्ट होईल.

महाराष्ट्र या सामन्यात सुरुवातीपासूनच आघडीवर होता तर अन्य सामन्यांचा मानाने या सामन्यात पॉंडिचेरीने महाराष्ट्राला थोडेफार झुंजवले. एकवेळ या दोन संघात २१-१३ असा गुणांचा फरक होता. यावरून या सामन्याचा एकंदर अंदाज येतो.

महाराष्ट्राचा बाद फेरीचा सामना उद्या ४ वाजता होणार आहे.