Breaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा

मुंबई । ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची आज घोषणा झाली. यात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला ११ वर्षांनी पुरुष गटात विजेतेपद जिंकून देणाऱ्या रिशांक देवाडिगाकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.

१२ खेळाडूंच्या या संघात विशाल माने, नितीन मदने, विकास काळे, गिरीश इर्नाक, कृष्णा मदने, शिवराज जाधव, ऋतूराज कोरवी, विराज लांडगे, निलेश साळुंखे, रवींद्र ढगे आणि तुषार पाटील यांचा समावेश आहे.

संघ व्यवस्थापक म्हणून फिरोझ पठाण यांच्याकडे सोपवण्यात आले असून संघ प्रशिक्षक म्हणून माणिक राठोड यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.