महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- अभिजित कटकेची उप उपांत्य फेरीत धडक

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )

जालना | गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पुण्याचा अभिजित कटके, तानाजी झुंजूरके, निलेश लोखंडे, योगेश पवार, शाईनाथ रानवडे, विजय धुमाळ, सुनील शेवतकर, गोकुळ आवारे, संतोष लवटे, विलास डोईफोडे, बालारफि शेख, महेश वरुटे, विष्णू खोसे, रामलिंग नारंगवाडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धकांना नमवित आपले आव्हान कायम ठेवत आगेकूच केली आहे.

पुण्यच्या शिवराज राक्षे, उदयराज पाटील, आप्पा सरगर, समाधान पाटील, विजय धुमाळ, ज्ञानेश्वर जमदाडे, हरेश कराळे, कानिफनाथ काटे, सचिन मोहोळ, गुलाब आगरकर, शाम भोसले यांचे आव्हान संपुष्टात आले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती जिल्ह्यांच्या मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करत आपापल्या प्रतिस्पर्धकावर मात करत केली.

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी किताब व राज्य अजिंक्यपद कुस्ती अधिवेशन हे कुस्तीगीरांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्टयेची मानली जाते. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापुर, सोलापूर,अहमदनगर, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर येथील मल्लांनी नेत्रदीपक लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तिसऱ्या दिवशी जालना वासीयांना महाराष्ट्र केसरी गटाच्या प्रेक्षनिय लढतींची मेजवानी पहायला मिळाली. संध्याकाळच्या सत्रात कुस्त्या पहाण्यासाठी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडूंब भरले होते.

तिसऱ्या दिवशी गादी व माती विभागातील ६१,७० व ८६ किलो वजनी गटातील सेमीफायनल व फायनलच्या लढतीसह ७४, ९७ व ८६ ते १२५ (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोण कोण बाजी मारणार या संदर्भात संपूर्ण मैदान व मैदानाबाहेर तर्कवितर्क सुरु होते. विशेषतः गादी विभागातील पहिली लढत हि महाराष्ट्र केसरी किताबाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या गत वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके व शिवराज राक्षे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लढतीच्या पहिल्या काही मिनिटात दोघांनीही एकमेकांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. शिवराजने कुस्ती नकारात्मक केल्याने पंचाने अभिजितला एक गुण दिल्याने अभिजितने एका गुणाने खाते खोलले, यावेळी शिवराजने अभिजितचे दुहेरी पट काढण्याचा केलेला प्रयत्न अभिजितने हाणून पाडत शिवराजवर ताबा घेऊन दोन गुणांची कमाई करत गुण संख्या तीनवर नेली. पहिल्या फेरीत अभिजीतने ३-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीला शिवराज आक्रमक झाला यावेळी अभिजितनेही शिवराजचा एकेरीपट काढण्याचा केलेला प्रयत्न शिवराजने हाणून पाडत दोन वसूल करत लढतीत रंगत निर्माण केली. अखेरच्या काही सेकंदात पुन्हा अभिजितने दोन गुणांची कमाई करून ५-२ अशा गुणांनी हि लढत जिंकली. इतर झालेल्या लढतीत गणेश जगतापने हिंगोलीच्या सचिन मोहोळला चितपट केले, उस्मानाबादच्या विजय धुमाळने रायगडच्या कुणाल शेळकेला १-० ने, वाशिमच्या सुनील शेवतकरने कोल्हापूरच्या उदयराज पाटीलला ८-१, पुण्याच्या तानाजी झुंजूरकेने मुंबईच्या समाधान पाटीलचा ५-४ ने पराभव करून अनपेक्षित निकाल लावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. साताऱ्याच्या निलेश लोखंडेने अमरावतीच्या अब्दुल सईदला पराभूत केले, पुण्याच्या शाईनाथ रानवडेने गोंदियाच्या शरद तनपुरेचा २-०, बुलढाण्याच्या बालारफी शेखने नाशिकच्या सतिश यादवला चितपट केले. रत्नागिरीच्या संतोष दोरवडने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेला चितपट केले. बीडच्या गोकुळ आवारेने भांडाऱ्याच्या अभिषेक सामरला चितपट केले.

६१ किलो माती विभागात सेमीफायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा ७-० अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली, तत्पूर्वी निखिलने उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला ४-२ असे नमवून सेमीफायनल गाठली होती. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीअटीची लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर १२-११ असा निसटसा पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या (कांस्यपदक) लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर ५-४ अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.निखिल कदम आणि सांगलीच्या राहुल पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये ——————————————-

६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमीफायनल मध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा १०-० असा पराभव करून अंतिमफेरी गाठली. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर ४-२ अशी मात करून अंतिमफेरी गाठली आहे.
तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकाविले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर १०-० अशी मात करत कांस्यपदक जिंकले. अंतिम लढत कोल्हापूरचा सौरभ पाटील आणि कल्याणच्या जयेश साळवी यांच्यात झाली. यामध्ये सौरभने जयेशला पराभूत करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.

महत्त्वाच्या बातम्या:

पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे

मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…

आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी