महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )

महाराष्ट्र केसरी विजेत्यांवर लाखो रूपयांचे उधळण होते. जीप, बुलेट, स्कॅर्पिओ गाड्या बक्षिसे दिली जात असली तरी चमचमणार्‍या चांदीची गदा हेच लाखमोलाचे प्रतिष्ठेचे इनाम समजले जाते.

गौरवशाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा ही कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. गेली 35 वर्ष मोहोळ कुटुंबियांकडून ही गदेचे बक्षिस देण्याची महाराष्ट्र केसरीची परंपरा आहे.

महाराष्ट्र केसरीतील गटातील विजेत्यांना पदके देण्यात येतात. सार्‍या महाराष्ट्राला प्रतिक्षा असते ती गदा कोण उंचविणार याची. ही गदेची निर्मिती पुण्यात केली जाते. 1982 पर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमार्फत दिली जात असे.

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खा. अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास ‘गदा’ देण्याची परंपरा सुरू केली. मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करते. गेली 35 वर्ष स्वत: अशोक मोहोळ स्पर्धेच्या ठिकाणी ‘गदा’ स्वत: घेऊन जात असतात.

‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा बनवण्याचे कार्य गेली 27 वर्षापासून पुणे येथे स्थायिक असलेले ‘पानगरी’ कुटुंबीय करीत आहे. पेशवेकालीन पिढीतील सातवे वारस प्रदीप प्रतापराव पानगरी हेच ‘गदा’बनवण्याचे काम दरवर्षी मोठया कलाकसुरीने करीत असतात.

कशी असते महाराष्ट्र केसरी ची गदा
उंची – साधारण 27 ते 30 इंच. व्यास – 9 ते 10 इंच.
वजन – 10 ते 12 किलो
अंतर्गत धातू – अंतर्गत सागवानी लाकूड व त्यावर अत्यंत कोरीव काम आणि आकर्षक पिळे
बाह्य धातू – 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा त्याने हुबेहून कोरीव काम व झळाळी. गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवली असते व बरोबर 180 अंश फिरवून हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवले असते.

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी