शशी वैद्य मेमोरियल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, डेक्कन इ, एफसी अ, लॉ चॅर्जर संघांची आगेकूच

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात संजय सेठी, धनंजय पूर्वाणी, अभिषेक चव्हाण, विक्रम श्रीमळ, कमलेश शहा, डॉ. विकास, संजय सेठी व आरोहित श्रॉफ यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ संघाने मगरपट्टा ब संघाचा 24-6 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

डेक्कन इ संघाने एफसीटीसी संघाचा 20-10 असा पराभव केला. विजयी संघाकडून विश्वजीत पवार , श्रीकांत कुलकर्णी, गिरिष शहा, हेमंत पुरोहीत, केदार जाधव व किरण सोनावणे यांनी संघाला विजय मिळवू दिला.

संजय रासकर, पंकज यादव, मित सातोसकर, गणेश देवखीळे, राजेश जोशी, धनंजय कवडे, सचिन साळुंखे व पुष्कर पेशवे यांनी केलेल्या अफलातून खेळीच्या बळावर एफसी अ संघाने डेक्कन क संघाचा 24-2 असा एकतर्फी पराभव केला. लॉ चॅर्जर संघाने पीवायसी फायटर्स संघाचा 24-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
महाराष्ट्र मंडळ वि.वि.मगरपट्टा ब 24-6(100अधिक गट: संजय सेठी/धनंजय पूर्वाणी वि.वि.प्रदीप जगपाले/प्रदीप मित्र 6-2; खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीमळ वि.वि.रतिश आर/अमनदीप टी 6-1; 90अधिक गट: कमलेश शहा/डॉ. विकास वि.वि.मयूर पारीख/दिएगो ग्राफी 6-2; खुला गट: संजय सेठी/आरोहित श्रॉफ वि.वि.साकेत माळी/कृष्णन नारायण 6-1)

डेक्कन इ वि.वि एफसीटीसी 20-10(100 अधिक गट- विश्वजीत पवार / श्रीकांत कुलकर्णी वि.वि जयंतराव चितळे/सिध्देश परळकर 2-6, खुला गट-मनोज हार्डीकर/श्रीरंग भावे पराभूत वि अमित मुलकर/मनोज कुलकर्णी 2-6, 90 अधिक गट- गिरिष शहा/हेमंत पुरोहीतवि.वि अरविंद रायरीकर/देवेन बडवे 6-2, खुला गट- केदार जाधव/किरण सोनावणे वि.वि सुनिल लोणकर/कपिल जोशी 6-0

एफसी अ वि.वि डेक्कन क- 24-2(100 अधिक गट- संजय रासकर/पंकज यादव वि.वि सतिश बापट/केदार जोगळेकर 6-0, खुला गट- सुमित सातोसकर/गणेश देवखीळे वि.वि अशिष धोंडगे/किरण भंडारी 6-0, 90 अधिक गट- राजेश जोशी/धनंजय कवडे वि.वि मयुर गुजराथी/भरत ससबे 6-2, खुला गट- सचिन साळुंखे/पुष्कर पेशवे वि.वि शरद कल्याणी/समिर केक्रे 6-0)

लॉ चॅर्जर वि.वि पीवायसी फायटर्स 24-5(100 अधिक गट- भुषण तळवळकर/मिलिंद राउत वि.वि सुनिता रावळ/नरेश तिडके 6-3, खुला गट- श्रीनिवास रामदुर्ग/राहूल मंत्री वि.वि राहूल रोडे/अकाश सुपेकर 6-2, 90 अधिक गट- संदिप महेश्वरी/नितिन गवळी पुढे टाल 6-0, खुला गट- विक्रांत गुणे/ केदार राजपाठक वि.वि रवी रावळ/ नरेश तिडके 6-0)