महाराष्ट्र पोलीस पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, तर महिला संघाची उपांत्य फेरीत धडक

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने जयपूर-राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेत काल सर्व साखळी सामने पूर्ण झाले. महिला विभागातून ८ संघांनी तर पुरुष विभागातून १६ संघांनी बादफेरीत प्रवेश मिळवला आहे. आज उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले.

महिला विभागात आज महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीची लढत झाली. अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने ५-५ चढाईत बाजी मारली. ३१-३१ असा बरोबरीत राहिलेल्या सामना ३८-३५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४ वेळा तिसऱ्या चढाईत निर्यायक गुण मिळणाऱ्या भक्ती इंदुलकरने विजतात मोलाचा वाटा उचलला.

पुरुष विभागात उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली चांगली लढत झाली. महाराष्ट्र संघाने ३१-२९ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. गोवा पोलीस संघाचा एसएसबी ने ४६-२३ असा पराभव केला. तर यजमान राजस्थानने कर्नाटक वर ४६-१४ असा विजय मिळवला.

सीआयएसफ ने हरियाना पोलीसवर ३८-३१ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तामिळनाडू संघाने उत्तरखंडचा ५२-२६ असा पराभव केला. सीआरपीएफ ने ओडिसावर ४९-३९ असा विजय मिळवला.

सायंकाळ सत्र: (२ मार्च २०१९)
पुरुष विभाग उपांत्यपूर्व फेरी:-

१) महाराष्ट्र विरुद्ध एसएसबी
२) राजस्थान विरुद्ध तामिळनाडू
३) सीआयएसफ विरुद्ध बीएसफ
४) सीआरपीएफ विरुद्ध पंजाब

सकाळ सत्र: (३ मार्च २०१९)
महिला विभाग उपांत्य फेरी व अंतिम सामना

१) महाराष्ट्र विरुद्ध पंजाब

२) राजस्थान विरुद्ध एसएसबी