महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय

हैद्राबाद । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ५८-२० असा गुजरातचा पराभव केला. हा सामना जिंकून महाराष्ट्राने आपले उप-उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे.

ही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.

आजचा महाराष्ट्राचा साखळी फेरीतील शेवटचा सामना संध्याकाळी ५ वाजता पॉंडिचेरी संघासोबत होणार आहे. तर उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या होईल.