मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर

-अनिल भोईर

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १७ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ परभणी येथे १९ सप्टेंबर व २० सप्टेंबर दरम्यान पार पडली.

मुलांमध्ये नाशिक विभागाने तर मुलींमध्ये औरंगाबाद विभागाने १७ वर्षा खालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले. २१ सप्टेंबर रोजी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. यातून राष्ट्रीय पातळीवर १७ वर्ष खालील स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड करणात आली. श्री.ज्ञानेश्वर खुरंगे राज्य क्रीडा मार्गदर्शक अहमदनगर, श्री.विजय खोकले राज्य क्रीडा मार्गदर्शक गडचिरोली, श्री.आंनता शिंदे संघटना प्रतिनिधी मुंबई शहर याची निवड समिती मध्ये नेमणूक करण्यात आली होती.

१७ वर्ष खालील मुलांच्या संघात नाशिक विभागातून ३ खेळाडूंची निवड करण्यात आली. तर स्पर्धेतील उपविजयी अमरावती विभागातून ३ खेळाडूंची निवड झाली. मुंबई व पुणे विभागातून प्रत्येकी २-२ खेळाडूंची निवड झाली. कोल्हापूर व लातूर विभागातून प्रत्येकी १-१ खेळाडूला महाराष्ट्र संघात स्थान देण्यात आले आहे. राखीव खेळाडू म्हणून ५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

१७ वर्ष खालील मुलींच्या संघात विजेतेपद पटकवणाऱ्या औरंगाबाद विभागातून ३ खेळाडूंची निवड करण्यात आली. तर पुणे विभागातून ३ खेळाडूंची निवड झाली, तसेच कोल्हापूर विभागातून २ खेळाडूंची निवड करण्यात आली. मुंबई, लातूर, अमरावती व नाशिक विभागातून प्रत्येकी १-१ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. पाच खेळाडूंची राखीव खेळाडून मध्ये निवड करण्यात आली आहे.

शालेय १७ वर्षा खालील मुलाचा महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे:
सूरज आनंदराव पाटील (नाशिक), गौरव मच्छिंद्र तापकीर (नाशिक), तेजस दादोसा राऊत (अमरावती), श्रेयस सचिन उंबरदंड (नाशिक), सौरभ नानाभाऊ आरूडे (अमरावती), शुभम माणिक पाटील (कोल्हापूर), सौरव विठ्ठल सणस (मुंबई),रुद्राक्ष प्रसाद मनीष (लातूर), अभिजीत सुनील तरवडे (पुणे), करण धर्मेंद्र भगत (मुंबई), शेख गालीब शे जलील (अमरावती), यश संतोष नरळे (पुणे)
राखीव- पंकज राऊत (औरंगाबाद), अभिषेक गुंगे (कोल्हापूर), अक्षय घाडगे (अमरावती), आर्यवर्धन नवाले (लातूर), प्रणव गायकवाड (कोल्हापूर)

शालेय १७ वर्षा खालील मुलीचा महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे:
तृप्ती प्रदीप अंधारे (औरंगाबाद), स्वाती बाबासाहेब हागे (औरंगाबाद), शिवरजनी आनंदराव पाटील (कोल्हापूर), सानिका शंकर परीट (कोल्हापूर), निलम हनुमंत पाटील (औरंगाबाद), पल्लवी ज्ञानेश्वर चव्हाण(लातुर), ऋतुजा सुरेश लबडे (नाशिक), धनश्री गणेश कदम (अमरावती), सिजना शंकरनाथ योगी (पुणे), अंकिता शिवाजी बोडके(पुणे), सानिका परेश पाटील (मुंबई), रूणाली सुनिल जाधव (पुणे).
राखीव- ऐश्वर्या गोकुळ देवरे(नाशिक),शितल राजेंद्र शिंगाडे (पुणे), पायल जयवंत गोळे (मुंबई), सिध्दी दिपक शर्मा (लातुर),सायली शैलेश पाटणकर (मुंबई)

शालेय १७ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचे शालेय कबड्डी पूर्व प्रशिक्षण शिबीर २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१८ दरम्यान राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी येथे होईल. तर राष्ट्रीय स्पर्धा पुढील नियोजित कार्यक्रमानुसार मध्यप्रदेश मध्ये देवास जिल्हा मध्ये होईल.

 महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी

पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर

काय सांगता! सचिनचा गोलंदाजीतील विक्रम आज जडेजा मोडणार?