यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी सामन्याने होणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरवात, यावर होणार थेट प्रेक्षपण !

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर संस्था सौजन्या ने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे आयोजन करण्यात आली आहे.

आज पासून पाच दिवस या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. पुरुषांचे २५ तर महिलांचे २२ संघ यास्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आज संध्याकाळी होणार आहे. तब्बल ३३ वर्षांनी नाशकात राज्य निवड चाचणी स्पर्धा होत आहे.

स्पर्धेसाठी नाशिक कबड्डी असोसिएशन व सह्याद्री युवा मंच सिन्नर यांनी जोरदार तयारी केली आहे. कबड्डी चाहत्यांना सामने पाहण्यासाठी भव्य गॅलरी बनवण्यात आली आहे. जवळपास १०,००० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी असेल.

कबड्डीच्या थरार बरोबरच कबड्डी रसिकांना मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबर रोजी “चला हवा येऊ द्या” तील भाऊ कदम व कुशल बद्रिके उपस्थित राहणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी स्थानीक कलाकाराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला ६ मैदानावर पुरुषांचे ४ सामने तर महिलांचे २ सामने होतील. पुरुष विभातात यजमान नाशिक समोर रत्नागिरी जिल्हाचे आव्हान असणार आहे. तर गतविजेते पुणे विरुद्ध बीड सामना होईल. महिला विभागात यजमान नाशिक विरुद्ध परभणी सामना होईल. तर पालघर विरुद्ध लातूर सामने होतील.

थेट प्रेक्षपण: Maha Sports & Khel Kabaddi फेसबुक पेज

पहिल्या दिवशी होणारे उद्घाटनाचे सामने:
पुरुष विभाग
१)नाशिक विरुद्ध रत्नागिरी,
२)पुणे विरुद्ध बीड
३)जालना विरुद्ध हिंगोली
४)कोल्हापूर विरुद्ध पालघर

महिला विभाग
१)नाशिक विरुद्ध परभणी
२)पालघर विरुद्ध लातूर

महत्त्वाच्या बातम्या:

विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ