महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा: गतविजेता पुणे संघ स्पर्धेतून बाहेर, तर रत्नागिरीच्या दोन्ही संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिन्नर येथे सुरू असलेल्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत काल चौथ्या दिवशी बादफेरीचे सामने खेळवण्यात आले. महिलांचे ४ तर पुरुषाचे ४ उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. नंतर महिलांचे ४ व पुरुषांचे ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले.

उपउपांत्यपूर्व फेरीत महिला विभागात पालघर संघाने सातारा संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत पालघरने कोल्हापूरचा ३३-३१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

मुंबई उपनगर विरुद्घ मुंबई शहर यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरने ३९-२१ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. चढाईत कोमल देवकर व सायली नागवेकर यांनी ८-८ प्रत्येकी गुण मिळवले तर पूजा जाधवने ८ पकडी केल्या.

रत्नागिरी विरुद्ध नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात रत्नागिरी संघाने सहज विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. बलाढ्य पुणे संघाने ठाणे संघाचा पराभव उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

पुरुष विभागात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रायगड संघाने नंदुरबार वर ३४-२३ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. तर रत्नागिरी संघाने गतविजेत्या पुणे संघाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेला सामना मुंबई शहराने ३०-२० असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात पंकज मोहितेचा आक्रमक खेळ महत्वपूर्ण ठरला. तर संदेश कुळेने पकडीत चांगला खेळ केला. सांगली संघाने उपनगरचा २०-१६ असा पराभव केला.

आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या लढती होणार आहेत.

महिला विभाग उपांत्य फेरी सामने
१) मुंबई उपनगर विरुद्ध पालघर
२) पुणे विरुद्ध रत्नागिरी

पुरुष विभाग उपांत्य फेरी सामने
१) रायगड विरुद्ध रत्नागिरी
२) मुंबई शहर विरुद्ध सांगली

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर

स्टार क्रिकेटर अंबाती रायडूने घोषित केली निवृत्ती