राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आज दोन सामने, असे होतील पाहिल्यादिवशी सामने.

पटना येथे आजपासून ६६ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद- महिला स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना येथे ही स्पर्धा ११ जुलै ते १४ जुलै २०१९ या कालावधीत होईल.

आज सायंकाळी यजमान बिहार विरुद्ध उत्तराखंड यांच्यात उद्घाटन सामना होईल. तर महाराष्ट्राचा पहिला सामना मध्य प्रदेश विरुद्ध होईल. पाहिल्यादिवशी एकूण ४ सत्रात १२ सामने खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र आपला दुसरा साखळी सामना ही आजच राजस्थान विरुद्ध खेळणार आहे.

पहिल्या दिवसाचे सामने:

१) बिहार विरुद्ध उत्तराखंड
२) चंदीगड विरुद्ध वेस्ट बंगाल
३) ओडिशा विरुद्ध विदर्भ
४) छत्तीसगड विरुद्ध आसाम
५) आंध्र प्रदेश विरुद्ध मणिपूर
६) महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश
७) केरला विरुद्ध राजस्थान
८) उत्तर प्रदेश विरुद्ध पोंडीचेरी
९) पंजाब विरुद्ध झारखंड
१०) हरियाना विरुद्ध दिल्ली
११) महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान
१२) भारतीय रेल्वे विरुद्ध जम्मू आणि काश्मीर