महाराष्ट्राच्या महिला संघाला पुढचा सामना करो या मरो असाच

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या महिला संघाला आज हरियाणा संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हरियाणाने ४१-३५ असा विजय मिळवला. 

त्यामुळे साखळीतील शेवटचा सामना महाराष्ट्रासाठी करो या मरो असाच असेल.

हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. अनेक वेळा हरियाणा संघाने बढत घेतल्यावर महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी करत बरोबरी साधली. या सामन्यात  गुणफलक सतत दोन्हीकडे झुकत होता. शेवटच्या काही मिनिटात सायली केरीपाळे व श्रद्धा पवार यांच्या झालेल्या सुपर कॅच महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली.

या सामन्यात हरियाणाकडून प्रियंकाने १३ चढाईमध्ये ७ गुण घेताना ३ बोनस गुण घेतले तर साक्षीने १२ चढाईत ७ गुण घेतले. बचावात अंजुने २ सुपर टॅकल केले. महाराष्ट्राकडून सायली केरिपालने पहिल्या सामन्यातील फॉर्म कायम राखत या सामन्यातही चांगली कामगिरी केली. तिने ११ चढाईमध्ये ८ गुण घेताना २ बोनस गुण घेतले. 

श्रद्धा पवारने १० चढाईमध्ये ६ गुण घेतले तर सायली केरीपाळेने ११चढायात १० गुण घेतले.