महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक: कर्नाटकचा धावांचा डोंगर, मयांक अग्रवालचे नाबाद द्विशतक !

गहुंजे, पुणे । येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यात महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील २४५ धावांना प्रतित्तोर देताना कर्नाटकने दुसरा दिवसाखेर २ बाद ४६१ धावांचा डोंगर उभारला आहे.

कालच्या बिनबाद ११७ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केलेल्या कर्नाटकच्या आज दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी केली. आर समर्थने २१९ चेंडूत १२९ धावा केल्या तर मयांक अग्रवाल ३७३ चेंडूत २१९ धावांवर नाबाद आहे.

सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या करून नायरनेही १२१ चेंडूत नाबाद ५६ धावता केल्या.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद- २४५
कर्नाटक पहिला डाव: २ बाद ४६१
आर समर्थ- १२९, मयांक अग्रवाल खेळत आहे २१९, करून नायर खेळत आहे ५६