६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र वुशू संघाचे घवघवीत यश

स्कूल गेम्स फेडरेअशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र वुशू संघाने सहभाग घेतला होता. ३ जानेवारी पासून दिल्ली येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १७ आणि १९ वर्षाखालील महाराष्ट्र वुशू संघाने घवघवीत यश मिळवले आहे.

महाराष्ट्राचे १९ व १७ वर्षांखालील एकूण २२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ११ खेळाडूंनी पदक पटाकवले. ११ पैकी ३ सुवर्णपदक व ८ कांस्यपदक महाराष्ट्र वुशू संघाने पटकावली. संघ प्रशिक्षक दत्तात्रय पाटील व स्मितील पाटील आणि मार्गदर्शक स्वप्निल वारांगे व एस. एस. कटके यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

१९ वर्षाखालील वयोगटात ८० किलो खालील आदर्श यादवने सुवर्णपदक पटाकवले. तसेच आदर्श यादवची ज्युनिअर इंडिया प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.

१७ वर्षाखालील महाराष्ट्र वुशू खेळाडूंना मिळालेली पदके:

१) संदेश गोरे (सुवर्ण पदक ) ४५ किलो खालील
२) योगेश गुहे (कांस्य पदक) ४० किलो खालील
३) ऋषिकेश मालोरे (कांस्य पदक) ६५ किलो खालील
४) विवेक मंडल (कांस्य पदक) ७० किलो खालील
५) प्रतिक बनकर (कांस्य पदक) ८० किलो खालील
६) यश कांबळे (कांस्य पदक) ८५ किलो खालील

१९ वर्षाखालील महाराष्ट्र वुशू खेळाडूंना मिळालेली पदके:

१) अभय कहार (सुवर्णपदक) ७५ किलो खालील
२) आदर्श यादव ( सुवर्णपदक) ८० किलो खालील
३) रुपेश साखरे (कांस्यपदक) ४५ किलो खालील
४) हिरिषभ पाल (कांस्यपदक) ५६ किलो खालील
५) रवी सिंघ (कांस्यपदक) ७० किलो खालील

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या जश, पृथा यांची चमक

उदयोन्मुख खेळाडूंसाठी खेलो इंडिया स्पर्धा ही सुवर्णसंधी