महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 4-3 असा पराभव करत पहिल्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड मिक्स (पुरूष- महिला) हाॅकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले

पुणे| म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड मिक्स (पुरूष- महिला) हाॅकी स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 4-3 असा पराभव करत, विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्रच्या एेश्वर्या चव्हाण 3 -या, देवेंद्र वाल्मिकीने 4 थ्या, विकास पिल्ले ने 14 व्या तर, विक्रम यादवने 30 व्या मिनिटास गोल केला. कर्नाटक संघाच्या सोमन्ना प्रधानने 13,20,23 व्या मिनिटास गोल केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटक संघाने हरियाणा संघाचा 3-2 असा पराभव केला. कर्नाटकच्या पी.ए.पवित्रा ने 14 व्या, मोसिन मह्हमद राहिल ने 20 व्या, तर, सोमन्ना प्रधान ने 21 व्या मिनिटास गोल केले. हरियाणाच्या हरपाल सिंग ने 5 आणि 15 व्या मिनिटास गोल केले.

दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पंजाबचा 6-4 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या देवेंद्र वाल्मिकीने 1,7,9,26,27 व्या मिनिटास गोल केले. तर एेश्वर्या चव्हाण ने 23 व्या मिनिटास गोल केला. पंजाबच्या हार्दीक सिंग ने 2,18 व्या मिनिटास, जरमनप्रित ने 6 व्या, रितू राणी ने 12 व्या मिनिटास गोल केला.

स्पर्धेच्या बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात हाॅकी हरियाणा संघाने झारखंड संघाचा 10-3 असा पराभव केला. हरियाणाच्या हरपालसिंग याने 5, 13, 19 व्या मिनिटास गोल केले. अलु हरजित सिंग याने 18, 27 व्या मिनिटास, तर, जयबिर सिंग याने 24, 29 व्या मिनिटास गोल केले.

जगवंत सिंग, राणी आणि नवनित कौरने अनुक्रमे 9,12, 20 व्या मिनिटास गोल केले. झारखंडच्या सिमता मिंग, नोएल टोपनो आणि सुनिल एक्सा ने 11, 13, 16 व्या मिनिटास गोल केले.

दुस-या सामन्यात कर्नाटक संघाने ओडिसा संघाचा शुटआउटमध्ये 3-1 असा पराभव केला. सामन्याच्या निर्धारित वेळेत कर्नाटकाच्या जी.एन.पृथ्विराज, मोसिन महम्मद राहिल, सोमन्ना प्रधान, के.पी.सोमय्या यांनी प्रत्येकी 1,9,12,19 व्या मिनिटास गोल केले.

ओडिसाच्या टोफिल खुजर आमि सुमन खुजर ने अनुक्रमे 11 व्या आणि 20 व्या तर, निलम संदिप एक्सा ने 17,18 व्या मिनिटास गोल केले. तिस-या सामन्यात पंजाबने उत्तरप्रदेशचा 5-3 असा पराभव केला.

पंजाबच्या गुरूजीत कौर ने 7, रामानंददिप कौर ने 10, हार्दीक सिंग 10, रिना राणी 26, जरमनप्रित सिंग ने 28 व्या मिनिटास गोल केले. उत्तरप्रदेशच्या प्रिती दुबे ने 12 व्या, तर, सुमित कुमारने 12 आणि 14 व्या मिनिटास गोल केले.

चौथ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने तमिळनाडू संघाचा 5-2 असा पराभव केला. महाराष्ट्रच्या देवेद्र वाल्मिकी ने 4,10,11 व्या मिनिटास, ततरूण परेराने 19 व्या, एेश्वर्या चव्हाण ने 22 व्या मिनिटास गोल केले. तमिळनाडूच्या आर.टी. रघुराम ने 8 व्या आणि आर.एस.सुनिल मुर्ती याने 19 व्या मिनिटास गोल केले.