महाराष्ट्राने जिंकली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

कर्णधार रिशांक देवडिगाच्या अफलातून खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सेनादलचा ३४-२९ असा पराभव करत विजतेपद जिंकले. महाराष्ट्राला या स्पर्धेचे तब्बल ११ वर्षांनंतर विजेतेपद मिळाले. रिशांकने या सामन्यात तब्बल १८ गुण घेतले.

नाणेफेक जिंकून सेनादलचा कर्णधार सुरजीतने कोर्ट घेतले. महाराष्ट्राचा संघ या सामन्यात पहिल्या मिनिटापासून आघाडीवर होता. सामना सुरु शिवून १० मिनिटे झाली झाली असताना महाराष्ट्राकडे ९-४ अशी आघाडी होती. सामना सुरु होताच कर्णधार रिशांक देवाडिगाने सुपर रेड केली.

प्रो कबड्डीमधील दिग्गज खेळाडूंचा सेनादलमध्ये भरणा असताना रिशांक देवाडिगाच्या चांगला रेडमुळे महाराष्ट्र सामन्यात १३-४ असा आघाडीवर आला.

सामन्यातील पूर्वाधाचे ६ मिनिट बाकी असताना महाराष्ट्राने सेनादलला सर्वबाद केले. त्यानंतर निलेश साळुंखे आणि रिशांक देवाडिगा या जोडीने अफलातून चढाया करत सेनादलला जेरीस आणले. त्यानंतर मात्र सेनादलने चांगला खेळ करत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे १३-४ वरून स्कोर १५-११ असा झाला. यावेळी सेनादल कडून मोनू गोयतने चांगला खेळ केला.

जेव्हा पूर्वार्ध संपला तेव्हा महाराष्ट्र १७-१२ असा आघाडीवर होता.

उत्तरार्धात पुन्हा कर्णधार देवाडिगाने सुपर रेड करत महाराष्ट्राची आघाडी २०-१७अशी वाढवली. दुसऱ्या हाल्फमध्ये महाराष्ट्रावर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. मोनू गोयत सामन्यात सुपर १० घेऊन चमक दाखवली.

सामना संपायला ४ मिनिट बाकी असताना कर्णधार रिशांक देवाडिगाने गुण घेत महाराष्ट्राची आघाडी २२-२० अशी केली आणि सामन्यातील आपला सुपर १० पूर्ण केला. परंतु त्यानंतर केलेल्या सुमार खेळामुळे सामन्यात २२-२२ अशी बरोबरी झाली. पुन्हा रिशांक देवाडिगाच संघाच्या मदतीला धावून आला आणि आघाडी २३-२२ अशी केली.

त्यानंतर निलेश साळुंखे पकड करत सेनादलने सामन्यात २३-२३ अशी बरोबरी साधली. पुन्हा अजय कुमारने रेड करत ३ गुण घेतले आणि सेनादलला २५-२३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यात चमक दाखवलेला सेनादलचा स्टार खेळाडू मोनू गोयत सुपर टॅकल झाल्यामुळे संघ चांगलाच अडचणीत आला. त्यामुळे सामना २५-२५ असा बरोबरीत आला.

पुन्हा आघाडी मिळालेल्या सेनादलच्या मोनू गोयतचे सुपर टॅकल करत महाराष्ट्राने आघाडी २७-२६ अशी केली. कर्णधार रिशांक देवाडिगाने पुन्हा रेडमध्ये चमक दाखवत महाराष्ट्राला २९-२६ अशी आघाडी मिळवून दिली.

गिरीश इर्नाक हाय ५ करत आघाडी ३०-२६ घेतली. त्यानंतर कर्णधार रिशांक देवाडिगाने सुपर टॅकल करत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.