महाराष्ट्राच्या महिलांच्या कबड्डी संघाचा केरळविरुद्ध मोठा विजय

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच सामन्यात आज महाराष्ट्राच्या महिला संघाने केरळ संघावर ४७-२१ असा मोठा विजय मिळवला. तब्बल २६ गुणांनी विजय मिळवत महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत आपले विजयी अभियान सुरु केले.

या सामन्यात तब्बल तीन वेळा सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. महाराष्ट्राकडून चढाईमध्ये कोमल देवकर आणि सायली कारपाळेने प्रत्येकी ८ गुण घेताना प्रत्येकी एक पकडीतही घेतला.

अभिलाषा म्हात्रेनेही या सामन्यात चमकदार कामगीरी करताना ३ गुण चढाईमधून तर ४ गुण पकडीतून मिळवले. सुवर्णा बारटक्केने महाराष्ट्राच्या बचाव फळीत चांगली कामगिरी करताना ३ पकडी केल्या.

उद्या महाराष्ट्राच्या महिलांचा सामना उद्या हरियाणा संघाशी होणार आहे.