राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघ उपात्यफेरीत

पुणे । येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 9-1 असा पराभव केला.

महाराष्ट्रच्या एेश्वर्या चव्हाण ने 4, 9 व्या मिनिटास, भावना खाडे हिने 5, 30 व्या मिनिटास, लालरूत फिली ने 7,10 व्या मिनिटास, तर, प्रगती बेनवार, स्वाती जाधव, कविता विद्यार्थी यांनी सामन्याच्या 8,12,19 व्या मिनिटास गोल केले. तमिळनाडूच्या पी. सुगप्रियाने 20 व्या मिनिटास गोल केला.

पहिल्या सामन्यात हरियाणा संघाने झारखंडचा 11-1 ्सा पराभव केला. हरियाणाच्या नवनित कौरने 2 -या, 17 व्या आणि 26 व्या मिनिटास गोल केला. तर, मोनिकाने 3,8,29 व्या मिनिटास, उदीताने 6,24,25 व्या मिनिटास, राणी आणि राणी रितूने अनुक्रमे 11 आणि 20 व्या मिनिटास गोल केले. झारखंडच्या स्मिती मंग ने 13 व्या मिनिटास एकमेव गोल केला.

दुस-या सामन्यात उत्तरप्रदेश संघाने कर्नाटक संघाचा 5-3 असा पराभव केला. उत्तरप्रदेशच्या प्रिती दुबे हिने 7,22,29 व्या मिनिटास, तर, सोनिया खुशवाह ने 18 आणि 28 व्या मिनिटास गोल केले. कर्नाटकच्या पी.ए. पवित्रा, के.पी.मलिन आणि सी.एम.भागेश्री ने अनुक्रमे 10,19,20 व्या मिनिटास गोल केले.

तिस-या सामन्यात पंजाब संघाने ओडिसाचा 6-1 असा पराभव केला. पंजाबच्या पूजा राणी ने 4,7,26 व्या मिनिटास, गुरूप्रित कौर ने 5 व्या मिनिटास, रिना राणी ने 10, 28 व्या मिनिटास गोल केले. ओडिसाच्या इलमा मिंझ ने 19 व्या मिनिटास गोल केले.

पुरूषांच्या गटात कर्नाटक संघाने झारखंड संघाचा 8-3 असा पराभव केला. कर्नाटकच्या जी.एन.पृथ्विराज याने 3, 27 व्या मिनिटास, सुदेव अब्राहम आणि के.आर. भरत ने सामन्याच्या 6 व्या मिनिटास, तर, मोसिन महम्मद राहिल ने 9, 16, 17, 28 व्या मिनिटास गोल केले. झारखंडच्या सोरंग जिन ने 5 व्या तर नोईल टोपनो ने 8 व्या आणि 23 व्या मिनिटास गोल केले.