महाराष्ट्र महिला हॉकी संघाचा शानदार विजय

पुणे । म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने झारखंड संघाचा 3-2 असा पराभव केला. झारखंडच्या स्मिता मिंझ हिने सामन्याच्या 9 व्या मिनिटास गोल करत आघाडी घेतली. मात्र, सामन्याच्या 10 व्या आणि 12 व्या मिनिटास गोल करत महाराष्ट्राच्या एच. लालरूत फिलीने संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर झारखंडच्या कांती प्रधान हिने 26 व्या मिनिटास गोल करत 2-2 अशी बरोबरी साधली. सामन्याच्या 29 व्या मिनिटास लालरूत फिलीने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली.

महिलांच्या पहिल्या हाॅकी सामन्यात हरियाना संघाने हाॅकी ओडिसा संघाचा 9-1 असा पराभव केला. हरियानाच्या नवजित कौर, उदीता, नवज्योत कौर, राणी रितू यांनी अनुक्रमे 4,10,23, आणि 24 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केले. तर, मोनिकाने 11,30 व्या मिनिटास आणि राणीने 19,20,25 व्या मिनिटास गोल केले. ओडिसाकडून सुधा स्वयंम साधु हिने 12 व्या मिनिटास एकमेव गोल केला.

दुस-या सामन्यात हाॅकी कर्नाटका संघाने हाॅकी तमिळनाडू संघाचा 7-2 असा पराभव केला. कर्नाटकाच्या पी.ए. पवित्रा हिने 2, 19 व्या मिनिटास, सी.एम.भाग्येश्री ने 7,22 व्या मिनिटास, बी.एम.कोमला हिने 8, 27 व्या मिनिटास, आणि के.एन.विद्या हिने 12 व्या मिनिटास गोल केले. तर, तमिळनाडूच्या जे अम्मुकुट्टी आणि ए.गायत्री यांनी सामन्याच्या 3 -या आणि 20 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केले.

हाॅकी पंजाब आणि हाॅकी उत्तरप्रदेश यांच्यातील तिसरा सामना 6-6 असा बरोबरीत सुटला. पंजाबच्या राणी पूजा हिने 1,27,29 व्या मिनिटास, तर, राणी रितू, गुरप्रित कौर आणि नरिंदर कौर यांनी सामन्याच्या 11,15,18 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केले. उत्तरप्रदेशच्या प्रिती दुबे हिने 4,21 व्या मिनिटास, श्रेया सिंग हिने 7,20 व्या मिनिटास, वंदना कटारीया हिने 16, 21 व्या मिनिटास गोल केला.

महाराष्ट्र पुरुष संघाला मात्र पराभवाचा धक्का

पुरूषांच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्कठा वाढवलेल्या महाराष्ट्र विरूद्ध उत्तरप्रदेशच्या सामन्यात उत्तरप्रदेश संघाने महाराष्ट्र संघाचा 8-7 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या देवेंद्र वाल्मिकीने 3,6,13 27 व्या मिनिटास गोल केले. अनिकेत गुरवने 18 आणि 27 व्या मिनिटास दोन गोल. तर, विक्रम यादवने 5 व्या मिनिटास एक गोल केला. उत्तरप्रदेशच्या अजय यादवने 5,23,30 व्या मिनिटास, सुमित कुमार ने 7,22 व्या मिनिटास, राज कुमार पाल ने 16 आणि 28 व्या मिनिटास तर, अतूल दिप ने 17 व्या मिनिटास गोल केला.

मंगळवारी झालेल्या पुरूषांच्या दुस-या सामन्यात हाॅकी कर्नाटक संघाने उत्तरप्रदेश संघाचा 12-6 असा पराभव केला. यामध्ये कर्नाटकच्या सोमनाथ प्रधान याने 4 आणि 12 व्या मिनिटास गोल केले. जी.एन.पृथ्वीराज याने 6,12,27 व्या मिनिटास, के.पी.सोमहा याने 10, 20 व्या मिनिटास, सुदेव अब्रान, सी.ए.पोनन्ना आणि विरन्न गौडा यांनी अनुक्रमे 13 आणि 14 व्या मिनिटास प्रत्येकी एक-एक गोल केले. मोसिन मोहम्मद राहिल याने 28 आणि 29 व्या मिनिटास गोल केले. उत्तर प्रदेशच्या राजकुमार पाल याने 18 व्या मिनिटास, सुमित कुमार याने 21, 25, 26 व्या मिनिटास आणि अजय यादव याने 22, 29 व्या मिनिटास गोल केले.

तिस-या सामन्यात हाॅकी हरियाना संघाने हाॅकी पंजाब संघाचा 8-7 असा पराभव केला. हरियानाच्या जयवंत सिंग याने 4,21, 25, 28 व्या मिनिटास तर, जसबिर सिंग याने 6,12,14 व्या मिनिटास आणि शेरसिंग याने 29 व्या मिनिटास गोल केले. पंजाबच्या कुनवरदिलराज सिंग याने 7 व्या, जनमतप्रित सिंग याने 11,12, 23 व्या मिनिटास, हार्दीक सिंग याने 14,30 व्या मिनिटास, आणि सरबजित सिंग याने 27 व्या मिनिटास गोल केले.

चौथ्या सामन्यात हाॅकी ओडिसा संघाने हाॅकी झारखंडचा 9-6 असा पराभव केला. ओडिसाच्या राकेश टिटिने 3, 30 व्या मिनिटास, संजिप निलम एक्सी याने 9,27 व्या मिनिटास, संजय एक्सोलो याने 11, 14,30 व्या मिनिचास, आणि टोपोल कुजर याने 20, 29 व्या मिनिटास गोल केले. त्यांच्या विरोधात झारखंडच्या नाॅईल टोपनो याने 4,10, 18, 24 व्या मिनिटास, तर विजय एक्सा आणि भंगरा मंगरा यांनी 17 व्या आणि 22 व्या मिनिटास गोल केले.