राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाची विजय घौडदौड सुरू

म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटास पंजाबच्या राणी पूजा हिने गोल केला. 
मात्र, त्यानंतर महाराष्ट्राच्या लालरूत फिली हिने दुस-या आणि 18 व्या मिनिटास गोल केले. तर, कविता विद्यार्थीने 10 व्या आणि 16  व्या मिनिटास गोल केले. एेश्वर्या चव्हाणने 30 व्या मिनिटास गोल केला.
पहिल्या सामन्यात हरियाणा संघाने कर्नाटक संघाचा 4-2 असा पराभव केला. हरियाणाच्या  राणीने सामन्याच्या पहिल्या आणि 13 व्या मिनिटास गोल केले. नवनित कौरने 4 थ्या आणि मनप्रित कौरने 5 व्या मिनिटास गोल केले. कर्नाटकाच्या पी.ए.पवित्रा ने 2 -या आणि एन. निवेदिताने 13 व्या मिनिटास गोल केले.
दुस-या सामन्यात ओडीसा संघाने तमिळनाडूचा 8-3 असा पराभव केला. तमिळनाडूच्या ए.गायत्रीने 3 -या आणि 13 व्या मिनिटास, आणि ओ. नर्मदा ने 27 व्या मिनिटास गोल केले.  ओडिसाच्या प्रियंका एक्काने 4 थ्या आणि 5 व्या मिनिटास, दिप्ती लाकरा 14 व्या मिनिटास, पुनम मिंझ 15,18,19,25 व्या मिनिटास आणि खुशबु काजुर ने 29 व्या मिनिटास गोल  केले.
तिस-या सामन्यात हाॅकी झारखंड संघाने उत्तरप्रदेश संघाचा 3-1 असा पराभाव केला. झारखंडच्या स्मिता मिंगने 3 -या, बेतन डूंगडूंग ने 20 व्या तर, कांती प्रधानने 26 व्या मिनिटास गोल केले. उत्तरप्रदेशकडून प्रिती दुबे ने एकमेव गोल केला.
पुरूषांच्या सामन्यात कर्नाटकाच्या संघाने महाराष्ट्र संघाचा 6-2 असा पराभव केला. कर्नाटकाच्या जी.एन. पृर्थ्विराजने 5 व्या मिनिटास, के.आर. भरत ने 13, 23 व्या मिनिटास, तर, मोसिन मह्हमद राहिल 27 व्या, विरण्णा गौड 29 व्या, सी.ए.पुनन्ना ने 30 व्या मिनिटास गोल केले. महाराष्ट्राकडून देवेंद्र वाल्मिकीने 7 व्या आणि 19 व्या मिनिटास गोल केले.