महाराष्ट्राच्या रणरागिणींची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये जोरदार विजयी सलामी

पुरुषांच्या संघाच्या विजयी सलामीनंतर महाराष्ट्राच्या महिलांच्या संघानेही विजयी सलामी दिली आहे. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने शेजारील राज्य गुजरातच्या संघाचा दारुण पराभव करताना ७७-१९ असा पराभव केला.

सामन्यात पहिल्या हाल्फमध्ये महिलांचा संघ ४२-९ असा आघाडीवर होता. दुसऱ्या सत्रात गुजरात संघाने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु महिलांच्या संघाने अनुभवाच्या जोरावर मोडून काढत ७७-१९ असा विजय मिळवला.

ही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.

महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे असून भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेही संघात आहे. आज हा सामना सकाळच्या सत्रातील शेवटचा सामना होता. आता पुढील सामना आजच संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी उत्तराखंड संघासोबत आहे.