महाराष्ट्राच्या रणरागिणींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय

हैद्राबाद । दिवसात सलग दुसरा सामना जिंकत महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी उत्तराखंडचा ५२-१६ असा पराभव केला.

सकाळी याच संघाने शेजारील राज्य गुजरातच्या संघाचा दारुण पराभव करताना ७७-१९ असा विजय मिळवला होता.

उत्तराखंड विरुद्ध सामन्याच्या सुरुवातीला ८-३ अशा आघाडीवर असलेल्या महिलांच्या संघाने ही आघाडी कायम ठेवत पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर २३-३ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात उत्तराखंडला डोके वर काढू न देता महाराष्ट्राच्या संघाने ५२-१६असा विजय मिळवला.

ही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.

महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे असून भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेही संघात आहे. आजचा हा शेवटचा सामना होता. आता पुढील सामना उद्या ओडिशा संघासोबत सकाळी ९ वाजता आहे.