महाराष्ट्राच्या महिला संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक, आज संध्याकाळी होणार सामना

हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जबदस्त फॉर्म असलेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाने आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायली जाधव नेतृत्व करत असलेल्या संघाने आज बंगालचा ४१-२१ असा पराभव केला.

महिलांचा आजचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

,महाराष्ट्राच्या संघाने साखळी फेरीत ३ पैकी ३ सामन्यात विजय मिळवत क गटात अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे आज इ गटातील दुसऱ्या स्थानावरील बंगाल संघाविरुद्ध महाराष्ट्राचा सामना झाला.

ही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.

महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे असून भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेही संघात आहे.