राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा सलग तिसरा विजय

हैद्राबाद । काल दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने आज ओडिशा संघावरही विजय मिळवला. या एकतर्फी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने ६४-१५ असा विजय मिळवला.

हा महाराष्ट्राच्या महिला संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. या विजयाबरोबर संघ ड गटात अव्वल ठरला. महाराष्टाने पहिल्या सामन्यात गुजरात संघाचा पहिल्या सामन्यात ७७-१९ असा तर दुसऱ्या सामन्यात उत्तराखंडचा ५२-१६ असा पराभव केला होता.

महाराष्ट्राचा महिलांचा संघ कालच उप-उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला होता.

ही स्पर्धा हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सुरु आहे.

महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे असून भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेही संघात आहे. महिलांचा बाद फेरीचा सामना इ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी उद्या ११ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे.