रोमहर्षक सामन्यात महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर १ गुणाने विजय

फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज महाराष्ट्राने उत्तरप्रदेशचा एक गुणाने पराभव केला. महाराष्ट्राने या सामन्यात ३४-३३ असे उत्तरप्रदेशाला पराभूत केले.

महाराष्ट्राकडून या सामन्यात कर्णधार रिशांक देवाडिगाने २२ रेमध्ये ९ गुण घेतले तर निलेश साळुंखेने ७ गुण रेमध्ये तर ३ गन टॅकलमध्ये घेतले. महाराष्ट्राच्या ३४ गुणांमधील ११ गुण हे टॅकलमधून आले होते.

पूर्वार्धात महाराष्ट्र संघ २०-१६ असा आघाडीवर होता परंतु ही ४ गुणांची आघाडी महाराष्ट्राला शेवटपर्यंत टिकवता आली नाही आणि शेवटी महाराष्ट्राला १ गुणांनी निसटता विजय मिळाला.