ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक            

पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वॉटरपोलो प्रकारात अंतिम फेरीत मुलांच्या गटात बंगाल संघाने महाराष्ट्र संघाचा ८-६ असा, तर मुलींच्या गटात बंगाल संघाने कर्नाटक संघाचा ८-३ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात बंगाल संघाने महाराष्ट्र संघाचा ८-६ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी संघाकडून अंकित प्रसादने दोन गोल, तर सौरभ सरदार, विशाल यादव, सागर मोंडल, दिपांकर सरदार यांनी प्रत्येकी एक गोल केला. निर्धारित वेळेत सामना ६-६ असा बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटआऊट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूट आऊट मध्ये बंगाल संघाने दोन गोल केले.

महाराष्ट्र संघाकडून भागेश कुठे व वैभव गुप्ता यांनी प्रत्येकी २ गोल तर, भूषण पाटील, अभिषेक गुप्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला. ३ व ४ थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सीबीन वर्घसे याने नोंदविलेल्या सहा गोलांच्या जोरावर केरळ संघाने कर्नाटक संघाचा १६-१ असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बंगाल संघाने कर्नाटक संघाचा ८-३ असा पराभव विजेतेपद पटकावले. बंगाल कडून अनुश्री दासने ४ गोल, जास्मिन जतूनने ३ गोल, तमाली नस्करने एक गोल केला. पराभूत संघाकडून नयना मनुर, शिवानी रेड्डी, शिवानी एस यांनी प्रत्येकी एक गोल केला. ३ व ४ थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा ९-६ असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र कडून पायल घनकरीने सर्वाधिक ५ गोल, राधिका कडूने २ गोल, नम्रता व्यवहारे व महिमा मोसेस यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले:

बंगाल: ८(सौरभ सरदार १, अंकित प्रसाद २, विशाल यादव १, सागर मोंडल १, दिपांकर सरदार १)वि.वि.महाराष्ट्र: ६(भागेश कुठे २, भूषण पाटील १, अभिषेक गुप्ता १, वैभव गुप्ता २);

 

३ व ४ थ्या क्रमांकासाठी:

केरळ: १६ (सीबीन वर्घसे ६, मिधुन एजे २, संदीप डिएस २, अप्पू एनएस २, विष्णू आर २, रोहित एजे १, क्रिशन उन्नी १)वि.वि.कर्नाटक: १(हर्षथ एस १);

 

मुली:

बंगाल: ८(तमाली नस्कर १, अनुश्री दास ४, जास्मिन जतून ३)वि.वि.कर्नाटक: ३ (नयना मनुर १, शिवानी रेड्डी १, शिवानी एस १);

३ व ४ थ्या क्रमांकासाठी:

महाराष्ट्र: ९ (राधिका कडू २, नम्रता व्यवहारे १, पायल घनकरी ५, महिमा मोसेस १) वि.वि.केरळ: ६ (द्रिश्या एव्ही १, सूर्या व्हीएस २, कृपा आर आर १, अक्षयवरली आर २).