पूनम राऊत: सिंधुदुर्गातील पहिली आतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटर

सिंधुदुर्गातील पहिली आतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटर पूनम राऊत ही सध्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत आहे. इग्लंड विरूध्द झालेल्या पहिल्याच सामन्यात तिने ८६ धावांची उत्तम खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. पूनम राऊत हिने आतापर्यंत ४५ एकदिवसीय सामन्यात १२७२ धावा केल्या आहेत तर ३५ टी२० सामन्यात ७१९ धावा केल्या आहेत.

१९ मार्च २००९ साली वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय सामन्यात तिने पदार्पण केले होते. सर्वात मोठ्या भागीदारीचा विश्वविक्रम हा पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा यांच्या नावावर आहे. या दोघींनी मिळून विक्रमी ३२० धावांचा डोंगर रचला होता. त्यांनी हा विक्रम मे २०१७ला आयर्लंड विरुद्ध खेळताना बनवला होता. महिला क्रिकेटविश्वात पाहिल्यादाच ३०० धावांची भागीदारी झाली होती त्यात पूनमच्या १०९ धावांच योगदान  होत.

पुनम राऊत हिचे मूळ गाव हे गडमठ राऊतवाडी ( जि. सिंधुदुर्ग) येथे आहे .ती सध्या मुंबईत बोरिवलीला वास्तव्यास असते. तिचा पुढचा सामना हा २९ जूनला वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. तिच्या ह्या अभीमानस्पद कामगिरीची प्रशंसा अख्खा देश करत असताना प्रत्येक कोकणवासीयाला पुनमची कामगिरी बघून आज अभिमान वाटतोय.

-सचिन आमुणेकर (टीम महा स्पोर्ट्स )