श्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी 16 जूलैला भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे आता मुख्य प्रशिक्षक पदासाठी श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने अर्ज करणारे असल्याचे वृत्त आले आहे.

जयवर्धने सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे त्याला जर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळायचे असेल तर मुंबई इंडियन्सबरोबरील करार संपवावा लागेल.

श्रीलंकेचा माजी कर्णधार जयवर्धनेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून 2015 मध्ये केली होती. त्याने 2015 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने रिकी पॉटिंग ऐवजी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद स्विकारले.

त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने 2017 आणि 2019 आयपीएल मोसमाचे विजेतेपद मिळवले आहे.

मात्र अजून तरी जयवर्धनेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार आहे की नाही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.

त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.पण त्यानंतर बीसीसीआय नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या पदांसाठी हे अर्ज मागवले आहे. हे अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 जूलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा. 

महत्त्वाच्या बातम्या –

या ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक

अनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड

…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

एकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी