विश्वचषक २०११चा अंतिम सामना आता भूतकाळ जमा – माहेला जयवर्धने

विश्वचषक २०११चा अंतिम सामना जेव्हा आम्ही हरलो तेव्हा वाईट वाटले पण आत्ता ते भूतकाळ जमा झाले आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि २०११च्या विश्वचषक संघाचा सदस्य माहेला जयवर्धने याने व्यक्त केले.

आज जोपर्यंत मी ट्विटर उघडले नव्हते तोपर्यंत मला माहिती पण नव्हते कि आज त्या सामन्याला ६ वर्ष झाले आहेत . त्या सामन्यात ५०००० प्रेक्षकांच्या पुढे खेळण्याचा अनुभव काही वेगळाच होता ” असे श्रीलंकेचा अंतिम सामन्यातील शतकवीर जयवर्धने म्हणाला .

“त्यादिवशी भारताने आमच्यापेक्षा खूप चांगला खेळ केला आणि त्याला आता सहा वर्ष झाली, आता त्या गोष्टीचा त्रास होत नाही. खूप गोष्टींमुळे आयुष्यात त्रास त्रास होत असतो, मी ५ पैकी ४ आयसीसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांचे अंतिम सामने हरलो आहे. परंतु आपण आयुष्यत असाच गोष्टींमधून शिकत असतो. ” असे जयवर्धने म्हणाला.

Source – Hindustan Times

जयवर्धनेला नुकतेच आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. या आधी जयवर्धनेने इंग्लंड संघाचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. या वर्षीच्या मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलताना जयवर्धने म्हणाला, “ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मला दोन पावले मागे घेऊन खेळाडूंना खेळण्याचं स्वातंत्र्य द्यावं लागणार आहे. आमच्याकडे जबदस्त खेळाडूंचा भरणा आहे. मी यापूर्वी वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून खेळलो आहे. आणि मुंबई विरुद्ध खेळणं हे कायमच आव्हानात्मक राहिले आहे.”

जयवर्धनेने आयपीएलचे महत्व अधोरेखित करताना हा एक तरुण खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले आहे.