त्या गोष्टीमुळे महेश भूपती पत्नी लारा दत्तावर संतापला!

भारताचा महान टेनिसपटू महेश भूपती काल आपली पत्नी बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्तावर चांगलाच संतापला. त्याचे कारण म्हणजे भूपतीची आयुष्याची कमाई लारा दत्ताने अक्षरशः काही मिनिटात पाण्यात घातली.

काय आहे नक्की स्टोरी:

काल मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी येऊ नये म्हणून लारा दत्ताने टॉवेल दरवाज्यात लावले. परंतु हे टॉवेल साधेसुधे नसून ज्या महत्त्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जगात होतात त्यात महेश भूपतीने वापरलेले होते. याबद्दल लारा दत्ताने एक ट्विट करून याबद्दल म्हटले की आमचे यूएस ओपन, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे टॉवेल चांगल्या कामासाठी वापरत आहे. मुंबईकर सुरक्षित रहा. जमल तर घराच्या बाहेर जाणे टाळा.

यावर चिडलेल्या महेश भूपतीने ट्विट करून तू माझी मजाक तर करत नाही ना असे विचारले. शिवाय हे सर्व अनेक वर्षांच्या कष्टातून मिळाल्याचं सांगितलं.

यांनतर टेनिसप्रेमींनी लारा दत्ताला मोठ्या प्रमाणावर ट्रॉल केल. दोघांच्याही ट्विटला अनेक रिप्लाय आले.

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर?
ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये आणि अन्य टेनिस स्पर्धांमध्ये खेळाडूंना घाम आणि अंग पुसण्यासाठी टॉवेल दिले जातात. त्यात प्रतिष्ठेच्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांमधील टॉवेलचे कधी कधी लिलाव देखील होतात. प्रत्येक वर्षाच्या स्पर्धांसाठी खास टॉवेल बनवलेले असतात. जगातील अनेक खेळाडू हे टॉवेल आठवण म्हणून जपून ठेवतात. ग्रँड स्लॅम स्पर्धांतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी खेळाडू आठवण म्हणून घरी आणतात. त्यातील टॉवेल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.