या माजी खेळाडूने केले धोनीच्या २०१९च्या विश्वचषक सहभागाबद्दल मोठे वक्तव्य

 

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीचा २०१९विश्वचषकात समावेश करावा किंवा नाही याबद्दल टीका करण्यापेक्षा एक उपाय सुचवला आहे. जर धोनीला २०१९च्या विश्वचषकात खेळायचे असेल तर त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल आणि सतत धावा जमा कराव्या लागतील असेल ते म्हणाले आहेत.

अमरनाथ म्हणतात, ” जर धोनीला या संघात राहायचं असेल तर त्याला सतत धावा कराव्या लागतील. कारण सध्या खूप स्पर्धा आहेत आणि अनेक चांगले खेळाडू संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. ”

“२०१९ विश्वचषक जवळ आला आहे आणि धोनीची निवड ही तो धावा करतोय किंवा नाही यावर अवलंबून असेल. परंतु धोनीने चांगली कामगिरी करावी अशी मी त्याला शुभेच्छा देतो. मला अशा आहेत की जसा धोनी पूर्वी खेळत होता तसाच यापुढेही खेळेल. जर धोनीने चांगली कामगिरी केली तर निश्चित धोनीची २०१९च्या विश्वचषकात जागा आहे. “

 

मोहिंदर अमरनाथ हे १९८३च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात सामनावीर होते तर धोनीही २०११च्या विश्वचषकात अंतिम फेरीत सामनावीर ठरला होता.