दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर सुरु होत आहे.

त्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने रविवारी (५ ऑगस्ट) १३ सदस्सीय संघाची घोषणा केली आहे.

यामधून पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या बेन स्टोक्सच्या जागी अष्टपैलू ख्रिस वोक्सची निवड करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात बेन स्टोक्सची ब्रिस्टल येथे कोर्टाची सुनावनी असल्याने त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यात ब्रिस्टल येथील नाईट क्लबमध्ये गोंधळ घालत एका व्यक्तीला जखमी केल्याचा स्टोक्सवर आरोप आहे.

तर इंग्लंडच्या १३ सदस्सीय संघात मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलानला वगळून २० वर्षीय युवा फलंदाज ओली पोपला संधी देण्यात आली आहे.

२० वर्षीय ओली पोपन त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला धडाक्यात सुरवात केली आहे. त्याने त्याच्या पहिल्या १५ सामन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या आहेत.

त्यामुळे गेल्या पाच सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या डेव्हिड मलानना संघातील आपले स्थान गमवावे लागले आहे.

असा असेल दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ-

जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉश बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, जिमी पोर्टर, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल

-भारतीय गोलंदाज म्हणतो मी इंग्लंडमध्ये आनंद लुटायला आलोय