लसिथ मलिंगाच्या वनडे कारकिर्दीतील ३०० विकेट्स पूर्ण !

कोलंबो, श्रीलंका । येथे सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने ३०० विकेट्स घेतली आहेत. ३०० विकेट्स घेणारा तो जगातील १३ वा गोलंदाज तर चौथा श्रीलंकन गोलंदाज बनला आहे.

३०० वी विकेट ही त्याला विराट कोहलीच्या रूपाने मिळाली.

मलिंगाने आतापर्यंत २०३ वनडे सामन्यात ५.३० च्या इकॉनॉमीने ३०० विकेट्स घातल्या आहेत. मलिंगाची सरासरी २८ची आहे. मलिंगा हा क्रिकेट विश्वात ४ चेंडूत ४ विकेट घेणारा एकवेम गोलंदाज आहे.

मुरलीधरन, वास आणि जयसूर्यानंतर मलिंगा श्रीलंकेकडून ३०० विकेट्स घेणारा चौथा खेळाडू आहे.

३०० विकेट्स घेण्यासाठी सर्वात कमी एकदिवसीय सामने खेळणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मलिंगा ५व्या क्रमांकावर आहे. या यादीत ब्रेट ली (१७१) अव्व्ल स्थानी आहे. तो ३०० विकेट घेणारा जगातील१३वा गोलंदाज आहे तर ८वा वेगवान गोलंदाज आहे.