लसिथ मलिंगाला वनडे मालिकेतून वगळले 

पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या ५सामन्यांच्या वनडे मालिकेतून लसिथ मलिंगाला वगळण्यात आले आहे. ही मालिका युएईमध्ये १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या काळात होणार आहे.

श्रीलंका संघात पुनरागमन केल्यानंतर मलिंगा विशेष चमक दाखवू शकलेला नाही. त्याला भारताविरुद्ध झालेल्या मालिकेतही विशेष कामगिरी करता आली नाही.

पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ५ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यातील विजयासह श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.

मलिंगा आजपर्यंत लंकेकडून २०४ सामने खेळला असून त्यात त्याने २८.९२च्या सरासरीने ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडू होता.