मँचेस्टर सिटीने उडवला स्टोक सिटीचा धुव्वा!!

पेप गॉर्डिओलाच्या मँचेस्टर सिटीने केला ७-२ असा पराभव

इंग्लीश प्रीमीयर लीग दिवसेंदिवस आपल्या अनपेक्षित निकाल आणि विजेतेपदासाठी असलेल्या चढाओढीमुळे अधिकच रोचक होते आहे. मँचेस्टर सिटीने काल जिंकत आपली दावेदारी अधिक मजबूत केली तर मँचेस्टर युनाइटेडला काल लिव्हरपूल बरोबर ०-० ने समाधान मानावे लागले. गतविजेत्या चेल्सीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

मँचेस्टर सिटीचा सामना स्टोक सिटी बरोबर होता. सिटीने सुरुवातीपासून सामन्यावर आपला दबदबा कायम ठेवला. पहिल्या हाफमध्ये सिटी कडून जिसुस (१७), स्टर्लिंग (१९), आणि डेविड सिल्वा (२७) यांनी गोल केले तर स्टोक सिटी कडून डीओफ याने ४४ व्या मिनिटाला गोल केला.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच स्टोकच्या एड्वर्डसने दिलेल्या क्राॅसवर डीओफने हेडरने गोलचा प्रयत्न केला पण तो मँचेस्टर सिटीच्या वाॅल्करला लागून ओन गोल झाला आणि स्टोक सिटीने दुसरा गोल नोंदवला. नंतर मँचेस्टर सिटीतर्फे जिसुस (५५), फर्नाडिन्हो (६०), सने (६२), बर्नाडो सिल्वा (७९) यांनी गोल करत स्टोक सिटीचा ७-२ असा पराभव केला. सामन्याचा हीरो ठरला तो डी ब्रुने त्याने २ असीस्ट आणि २ गोल मध्ये की पासने संधी उपलब्ध करुन दिली.

दुसरीकडे मँचेस्टर सिटीचे पारंपारिक प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनाइटेडला लिव्हरपूल बरोबर ०-० असे समाधान मानावे लागले. युनाइटेडच्या फ़ॉर्वर्ड प्लेयर्सच्या अपयशामुळे त्यांना मिळालेल्या संधीचे गोल मध्ये रुपांतर झाले नाही. युनाइटेडचा गोलकीपर डेविड डी गिया जो सध्याचा सर्वोत्कृष्ट गोलकीपर मानला जातो त्याने काही अप्रतिम गोल वाचवत सामना बरोबरीत रोखण्यात महत्वाचा वाटा उचलला.

कालच्या निकाला नंतर मँचेस्टर सिटी ८ सामन्यात २२ गुणांसहप्रीमियर लीग मध्ये पहिल्या सतःवर आहे तर मँचेस्टर युनाइटेड ८ सामन्यात २० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

नचिकेत धारणकर 
(टीम महा स्पोर्ट्स)