मॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद

 ओल्ड ट्रेफोर्ड|  काल झालेल्या सामन्यात वेस्ट ब्रोमविच अलबिऑनने मॅनचेस्टर युनायटेडचा पराभव केला. ओल्ड ट्रेफोर्ड येथे झालेल्या  या पराभवामुळे मॅनचेस्टर युनायटेडला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

याचमुळे मॅनचेस्टर सिटीने युरोपातील सर्वोत्तम समजली जाणारी प्रिमियर लीगची ट्रॉफी जिंकली. 

वेस्ट ब्रोमने 1-0 असे युनायटेडला घरच्याच मैदानावर पराभूत केले. मॅनचेस्टर युनायटेडचा हा पराभव मॅनचेस्टर सिटीसाठी उत्तम ठरला. 73 व्या मिनीटाला जे रोड्रिगुझने केलेल्या गोलमुळे वेस्ट ब्रोमला आघडी मिळाली.

या पराभवाने सिटीने पहिल्या स्थानावर येऊन प्रिमियर लीगची ट्रॉफी ताब्यात घेतली. याआधीच्या सामन्यात सिटीने टोटेनहॅमला 3-1 ने पराभूत केले होते. हे सिटीचे 7 मोसमातील तिसरे विजेतेपद ठरले. 

सिटीचा मॅनेजर पेप गॉरडीओला मात्र यावेळी हजर नव्हता. तो आपल्या मुलासोबत गोल्फचा सामना बघायला गोला होता. यामुळे  पेपला त्याचा हा पहिला इंग्लिश ट्रॉफी जिंकलेला क्षण साजरा करता आला नाही. 

मॅनचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक जोस माऊरिन्हो म्हणाले, ” पुढच्या मोसमासात शेजारच्यांना आव्हान देण्यासाठी सातत्यमध्ये वेगळेपणा आणण्याची गरज आहे.”

तसेच वेस्ट ब्रोमचा हा या मोसमासातला चौथा विजय होता.

हे ही जाणून घ्या

6 मे ला हडर्सफिल्ड विरूध्दच्या सामन्यानंतर सिटीला प्रिमियर लीगच्या चषकाचे वितरण होणार आहे.

सिटीने जर शेवटच्या पाच सामन्यांपैकी 3 सामने जिंकले तर त्यांचे 96 असे विक्रमी गुण होतील. हे प्रिमियर लीगमधील आतापर्यंत जिंकलेल्या सामन्याचे  विक्रम तोडण्यासाठी पुरेसे आहे. तसेच सिटीने जर खेळामध्ये असेच सातत्य राखले तर ते गोलचे विक्रम पण मोडू शकतात. 

या लीगमधील सिटीचे ऊर्वरीत सामने 10 मे ला ब्रायटन तर 13 मे ला साऊथ्पटन विरूध्द आहेत.