फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल; प्रशिक्षकांची होणार पंचाईत

आता फुटबॉलच्या सामन्यांमध्ये संघाच्या खेळांडूबरोबर प्रशिक्षकानांही यलो आणि रेड कार्ड मिळतील. इंग्लंडमधील चार मोठ्या स्पर्धांमध्ये या नियमांचा वापर केला जाणार आहे.

आतंरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने हे नियम तयार केले आहेत. चॅम्पियन्स लीग, इंग्लिश फुटबॉल लीग वन आणि लीग टू, फुटबॉल कप (अमिराती एफ ए कप) आणि कॅराबाओ कप यांमध्ये हे नियम अंमलात आणले जाणार आहेत.

यलो कार्ड हे प्रशिक्षकांनी केलेल्या असभ्य भाषा, उपाहासात्मकपणे टाळ्या वाजवणे, पाण्याच्या बॉटल्स फेकणे अशा प्रकारच्या वागणुकीसाठी तर रेड कार्ड विरोधी संघाच्या खेळण्यात व्यत्यय आणणे, हिसांत्मक प्रकार आणि मैदानावर थुंकणे यासाठी दिले जाणार आहेत.

जर एका प्रशिक्षकाला चार यलो कार्ड्स मिळाले तर त्यांच्यावर एका सामन्याची बंदी असेल. आठ कार्ड्ससाठी दोन सामन्यांची, 12 कार्ड्ससाठी तीन सामन्यांची आणि 16 कार्ड्स मिळाले तर त्यांना विम्बलेमधील फुटबॉल असोसिएशनच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

जर बाकावर बसलेल्यांपैकी प्रशिक्षकानी असभ्य वर्तवणूक केली ज्यामुळे चालू सामन्यात अडथळा आला तर त्यांना पंच यलो कार्ड दाखवू शकतात”, असे इंग्लिश फुटबॉल लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन हार्वे म्हणाले.

“त्या प्रशिक्षकांनी शांत न बसता त्याच प्रकारच्या कृती सुरू ठेवल्या तर त्यांना दुसरे यलो कार्ड मिळेल. तसेच काही गंभीर घटना असेल तर त्यांना रेड कार्डही मिळेल आणि बाक सोडून स्टॅंडमध्ये जावे लागेल. असे केल्यास काही तांत्रिक ठिकाणी तसेच वागणुकीत त्याचे बदल दिसतील.”

प्रिमीयर लीगमधील प्रशिक्षकांना कार्डऐवजी सुचना दिल्या जाणार. पेप गॉर्डिओला आणि जोस मौरिन्हो यांचा संघ जर स्थानिक लीगमध्ये सहभागी झाला तर त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटमध्ये कबूतराने मिळवली पहिली विकेट

अॅलिसन बेकरचे गोलकिपींगचे कौशल्य पाहुन सलाह झाला अाश्चर्यचकित