बेलारूस ओपन टेबल टेनिस स्पर्धेत मानवला कांस्यपदक, हरमितची उप उपांत्यपूर्व फेरीत धडक

मिन्स्क । भारताचा युवा टेबल टेनिस खेळाडू मानव ठक्करला आयटीटीएफ चॅलेंज बेलगोस्टराख बेलारुस ओपन स्पर्धेत 21 वर्षाखालील पुरुष एकेरी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, हरमित देसाईने पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

मानवला उपांत्यफेरीत रशियाच्या डेनिस इवोनिनविरुद्ध (2-3) असे पराभूत व्हावे लागले.त्याने सामन्यात चांगली सुरुवात केली. त्याने पहिला गेम 11-5 असा जिंकला पण, पुढचा गेम 4-11 असा त्याला गमवावा लागला. यानंतर दोगांनीही एक-एक गेम जिंकत सामना 2-2 बरोबरीत आणला. पण, इवोनिनने शेवटचा गेम 11-9 असा जिंकत विजय मिळवला. यापूर्वीच्या फेरीत मानवने 21 वर्षाखालील जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या जपानच्या युकी मात्सुयामाला नमविले.

दुसरीकडे हरमितने रशियाच्या अलेकझे लिव्हेनत्सोवला 4-2 असे पराभूत केले. हरमितने पहिला गेम 11-9 असा जिंकला पण पुढचे दोन्ही गेम (6-11, 10-12) त्याला गमवावे लागले. हरमितने जोरदार पुनरागमन करत सलग गेममध्ये (11-7, 11-6, 11-6 ) विजय मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली.

उप उपांत्यपूर्व फेरीत हरमितचा सामना चीनच्या झेंग सूनशी होणार आहे. तर,पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात मानव ठक्करला बेल्जियमच्या रॉबिन देवोस कडून 0-4 (3-11, 11-13, 13-15, 10-12) असे पराभूत व्हावे लागले.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

दिल्ली डेअरडेविल्सकडून तीन मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू